जळगाव । लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी परवेज शेख रईस शेख व त्याचा फौजदार पिता रईस शेख या दोघांना पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. वाढदिवसानिमित्त गिफ्ट देतो असे सांगून नशेचे पान खायला देत परवेज शेख रईस शेख या पोलिसाने 24 वर्षीय तरुणीवर 2012 ते मे 2017 या कालावधीत शहरातील विविध हॉटेल्स, लॉज, पोलीस मुख्यालयातील गेम्स रुम, बस स्थानकातील कँटीनच्या वरच्या मजल्यावर व फर्दापूर येथे बलात्कार केला तर फौजदार असलेल्या रईस शेख या त्याच्या पित्याने त्याला मदत करुन तरुणीशी अश्लिल कृत्य व धमकी दिल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली आहे. त्यानुसार पिता-पुत्राविरुध्द 21 जून रोजी रात्री 10.30 वाजता बलात्कार व अश्लिल कृत्य व धमकीचा गुन्हा दाखल झाला होता.