माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची भावना
माजी खा. गुणवंतराव सरोदे अनंतात विलिन
चिरंजीव डॉ.अतुल सरोदे यांनी दिला अग्नीडाग
फैजपूर – भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे हे रविवारी पंचतत्वात विलीन झाले. त्यांचे चिरंजीव डॉ.अतुल सरोदे व कुटुंबीयांनी त्यांना साश्रू नयनांनी अग्नीडाग दिला. सायंकाळी सावदा येथील मस्कावाद रोडवरील भारतीबुवा देवस्थाना जवळील त्यांच्या शेतात अंतसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह उपस्थित नेत्यांनी राजकारण व समाजकारणातील पितृतुल्या व्यक्तीमत्व व चारित्रवाण समाजसेवकाला जिल्हा मुकला असल्याच्या भावना व्यक्त केल्या. डॉ.सरोदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांसह जिल्हाभरातून भाजप, संघ तसेच विविध पक्षांचे नेते व त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनातर्फे प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबाले यांनी डॉ. सरोदे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले होते.
यांची होती उपस्थिती
माजी महसुलमंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.नाना पाटिल, खासदार रक्षा खडसे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटिल, आ.हरिभाऊ जावळे, आ.राजूमामा भोळे, माजी आ.शिरीष चौधरी, माजी आ.मनीष जैन, अरुण पाटील, बी.एस.पाटील, राष्ट्रीय बेटी पढाव बेटी बचावचे संयोजक डॉ.राजेंद्र फडके, मसाका चेअरमन शरद महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, माजी माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, जामनेर नगराध्यक्ष साधना महाजन, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, माजी प्राचार्य अनिल राव, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार विजय ढगे यांच्या सह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी सह सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.