फैजपूर- वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जोपासण्यासाठी नितीन अशोक पाटील (रा.पाडळसे, हल्ली मुक्काम पुणे) यांनी जिल्हा परिषद कन्या शाळा व जिल्हा परीषद मुलांची शाळेला 26 हजार रुपये खर्चातून रंगकाम केले. वडील कै.अशोक डिगंबर पाटील यांचे स्मरणार्थ हा उपक्रम राबवण्यात आला. दानशूर व्यक्तीमत्वाचा सत्कार शाळेतर्फे व ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आला. प्रसंगी सरपंच ज्ञानदेव दांडगे, उपसरपंच राहुल पाटील, ज्ञानेश्वर तायडे, खेमचंद्र कोळी, किशोर कोळी, शेखर तायडे, नंदिनी तावडे, मंगला सुधाकर पाटील व शाळेतील मुख्याध्यापक जितेंद्र फिरके, मुख्याध्यापक कविता फिरके, सुनील पाटील, वंदना पाटील, सीमा जावळे, मंगेश पाटील, ज्योती पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते.