पित्याकडून 16 वर्षीय मुलीवर बलात्कार

0

पुणे । वडीलांकडून होणार्‍या अत्याचाराला शाळेतील समुपदेशनामध्ये तिने वाचा फोडली. वडिलांच्या क्रुरकृत्याचा पाढाच तिने यावेळी वाचला. सलग तीन वर्ष हा नराधम पोटच्या मुलीवर सतत अत्याचार करत होता. त्याच्या कृत्याला कंटाळून तिच्या आईनेही 2010 मध्ये आत्महत्या केली असल्याचे समोर आले.मुलीवर व स्वतःवर होणार्‍या आत्याचारामुळे 2010 मध्ये आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीने काही काळ कारावासही भोगला. सुटका झाल्यानंतर पुन्हा त्याने मुलीवर बलात्कार करण्यास सुरुवात केली. 2013 ते 2016 या कालावधीत नराधमाने मुलीवर अत्याचार केले. तिला त्रास होऊ नये यसाठी तो मेडीकलमधून गोळ्या आणून तिला द्यायचा. या घटनेची माहिती मुलीने सावत्र आईलाही सांगितली. मात्र, आईने मुलीलाच सुनावले. त्यानंतर सावत्र आईच बापाच्या गुन्ह्यात सहभागी झाली.

जिवे मारण्याची धमकी
ही सारी घटना शाळेत झालेल्या समुपदेशनात समोर आली. वडील सतत जिवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे तिने कधी या घटनेची वाच्यता केली नव्हती. मात्र समुपदेशनात विश्‍वासात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नराधम बापाविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.