नवी दिल्ली । तिन दिवसापुर्वी वडिलांचे निधन झाले असतांना दिल्ली डेअरडेविल्स संघाचा फलंदाज रिषभ पंत याने शनिवारी आपल्या संघासाठी धावून आला.त्याने अर्धशतकी खेळी खेळली.जरी हा सामना दिल्ली संघाला जिकता आलेला नसला तरी त्याने क्रिकेट चाहत्यांच्या मनात व त्यांना आपल्या खेळीने भरभरून आनंद दिला.
तेंडुलकर व विराट यांनीही दुःख बाजूला सारले होते
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्यानंतर विराट कोहली या क्रिकेटवीरांनी आपल्या वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून राज्यासाठी आणि देशासाठी मैदानावर उतरले होते. रिषभनेंही तशाच ’पॅशन’चे, संघभावनेचे दर्शन घडवले आहे. त्याबद्दल दिग्गजांनी त्याची पाठ थोपटलीय. भारताचा उदयोन्मुख क्रिकेटवीर रिषभ पंत या तरुणाने ’शो मस्ट गो ऑन’ या उक्तीला साजेशी कृती करून सर्वांची मने जिकली आहे. वडिलांच्या मृत्यूला अवघे तीन दिवस झालेले असताना, आपले दुःख उराशी बाळगून हा वीर आपल्या दिल्ली डेअरडेविल्स संघाच्या मदतीला धावून आला आणि खणखणीत अर्धशतकी खेळी करून त्याने क्रिकेटप्रेमींना भरभरून आनंद दिला. रिषभचे वडील राजेंद्र पंत यांचं बुधवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याला व त्याच्या कुटूंबासाठी मोठा धक्का होता. आयपीएलसाठी सज्ज झालेला रिषभही या बातमीने हादरला. या कठीण समयी धीराने घेवून घरी जाऊन सगळ्यांना सावरले.
गुरुवारी हरिद्वारला जाऊन वडिलांवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर फक्त एकच दिवस तो कुटुंबासोबत थांबला आणि शनिवारी दिल्ली डेअरडेविल्सच्या सहकार्यांसोबत मैदानावर उतरला.रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या तगड्या संघाविरुद्ध दिल्लीचा सामना होता. दु:ख मनात ठेवून आपल्या बॅटमधून संघासाठी अर्धशतकी खेळी खेळला. आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते.त्या धाव संख्येपर्यंत दिल्ली संघ पोहचू शकला नसला तरी रिषभने प्रयत्नांची शर्थ केली. 36 चेंडूत 57 धावांची तडाखेबंद खेळी त्यानं केली.