पिपळगांव येथे स्व.वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात

0

जळगाव । जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथुन जवळच असलेल्या पिंपळगाव कमानी तांडा येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स व जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक यांची 104 वी जयंती उत्साहात साजरी
करण्यात आली.

वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सरपंचपती अर्जुन राठोड, प्रेमराज चव्हाण यांच्याहस्ते पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद चव्हाण, गोकुळ राठोड, गणेश राठोड, विठ्ठल चव्हाण, बळीराम चव्हाण, श्रावण राठोड, दिलीप राठोड, मुख्याध्यापक गाडे, सहशिक्षक मोहिते, गीते, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.