पिप्राळा हुडकोतील घरकुलांमध्ये 14 जणांचा अनधिकृतपणे रहिवास

0

बाहेर काढण्यासाठी मनपाने केली पोलीस बंदोबस्ताची मागणी

जळगाव– केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको परिसरात 472 घरकुल बांधण्यात आले आहेत. यातील काही वाटप करण्यात आले आहेत.मात्र 14 जणांनी अनधिकृतपणे रहिवास केल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे अनधिकृत रहिवास करणार्‍यांना बाहेर काढण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.

मनपा प्रशासनाने दूध फेडरेशन समोरील झोपडपट्टीधारकांना पिंप्राळा हुडको येथे स्थलांतरीत केले होते.केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको परिसरात 472 घरकुल बांधण्यात आले.त्यानुसार पहिल्या टप्प्यातील घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित घरकुले वाटप करावयाची आहेत.मात्र काही महिन्यापूर्वी काही जणांनी अनधिकृत ताबा घेतला होता.त्यानुसार मनपा प्रशासनाने त्यांना बाहेर काढले होते.आता पून्हा 14 जण अनधिकृतपणे रहिवास करीत सल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.त्यानुसार संबंधितांना घरकुल खाली करण्याची सूचना देवून देखील खाली केले नाही.त्यामुळे .त्यामुळे अनधिकृत रहिवास करणार्‍यांना बाहेर काढण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.