‘पिफ’मध्ये महात्मा गांधी यांच्यावरील चित्रपट

0

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीची दखल घेण्यात आली असून, ‘इन सर्च ऑफ टुथ सेलिब्रिटिंग 150 इयर बर्थ अँनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ या संकल्पेनवर यंदाचा महोत्सव रंगणार आहे. पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दि. 10 ते 17 जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षीही विविध देशांकडून महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, 114 देशांमधून 1634 चित्रपट प्राप्त झाले आहेत. त्यातील निवडक 150 हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

महात्मा गांधी यांचे योगदान केवळ स्वातंत्र्यलढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. यावर्षी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आणि तत्वज्ञानावर आधारित काही जागतिक दर्जाचे चित्रपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. या महोत्सवातील चित्रपट पाहाण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com.या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीला सुरूवात होणार आहे.

पिफच्या ‘ट्रिब्युट’ विभागामध्ये संगीत, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांची साजरी होणार जन्मशताब्दी गदिमा, बाबुजी, पु.ल देशपांडे, उस्ताद अल्लारखाँ आणि स्नेहल भाटकर या साहित्य आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या जन्मशताव्दीवर्षास प्रारंभ झाला आहे. पिफमध्ये चित्रपटसृष्टीसाठी योगदान दिलेल्या दिग्गजांची दखल घेतली जाणार असून, ‘ट्रिब्युट’ विभागात त्यांनी अजरामर केलेल्या चित्रकलाकृती सादर केल्या जाणार असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.