पियाजो रिक्षा उलटून एक ठार

0

जामनेर । तालूक्यातील गारखेडा बुद्रुक गावाच्या स्मशान भुमीजवळ पियाजो रिक्षा उलटून जावून दबून एका प्रवाशाचा दबल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. जामनेर कडून भुसावळकडे जाणार्‍या पियाजो रिक्षा चालक देवानंद गोराडे याचे रिक्षावरून नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटून त्याखाली दबल्याने गारखेडा येथील रहिवासी सुधाकर मेतकर यांचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास गारखेडा गावाच्या स्मशानभुमी जवळ घडली. रिक्षात बसलेल्या प्रवाश्यांपैकी कुणाला तरी फिट सारखा प्रकार आल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे प्रवाशांच्या आरडाओरडीने चालक गोराडेचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटल्याचे सह प्रवाशांनी सांगितल्याचे कळते.याबाबत जामनेर पोलिस स्टेशनला चालक गोराडे विरोधात जगदिश महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोउनि सुनिल कदम यांच्यासह विलास चव्हाण हे करीत आहे.