चाळीसगाव : पिकअप व्हॅनमध्ये चार गुरांची निर्दयतेने कोंबून वाहतूक करणार्या दोघांना मेहुणबारे पोलिसांनी अटक केली असून चारही बैलांची सुटका करण्यात आली.
चार गुरांची सुटका
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावातील मारोती मंदीराजवळून चार बैलांचा निर्दयतेने कोंबून पिकअप व्हॅनमध्ये वाहतूक करीत असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना मिळाली. त्यानुसार मेहुणबारे पोलिसांनी शुक्रवार, 10 जून रोजी रात्री आठ वाजता कारवाई करत वाहन ताब्यात घेत चारही बैलांची सुटका केली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी शोएब खान ईकबाल खान (24) आणि अनिस खान हमीद खान (25, दोन्ही रा.चाळीसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक अनवर तडवी करीत आहे.