यावल : यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथील ग्रामपंचायतीचे कार्यालयाचे कुलूप तोडून एकाने संगणकासह साहित्याची नासधूस केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविारोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहा हजारांचे नुकसान
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय आहे. या कार्यालयात मध्यरात्री संशयित आरोपी देवेंद्र रतन कोळी (रा.पिळोदा खुर्द, ता.यावल) याने ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयातील संगणक मॉनिटर, प्रिंटर आणि कीबोर्ड असा एकूण 6 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमालाची नासधूस केली. याप्रकरणी यावल आज गुरुवार, 21 जुलै रोजी पोलीस ठाण्यात ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी देवेंद्र रतन कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.