पिळोदा- थोरगव्हाण रस्त्यावर मालवाहू अॅपेरिक्षा पलटल्याने एकाचा मृत्यू

0

यावल- तालुक्यात अपघाताची मालीका थांबता-थांबत नसल्याचे चित्र आहे. काल शनिवारी सांयकाळी पिळोदा- थोरगव्हाण रस्त्यावर मालवाहू अॅपेरिक्षा रस्त्याच्या कडेला पलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. वना गोविंदा भिल (वय ५५) रा. दगडी ता.यावल असे मयताचे नाव आहे. अपघातानंतर रिक्षातील चालकासह सर्वजण फरार झाले.

प्राप्त माहितीनुसार विना क्रमांकाच्या माल वाहतुक करणाऱ्या अॅपेरिक्षा मध्ये काही जणांना घेवुन रिक्षा चालक थोरगव्हाण कडून मनवेल कडे येत होता दरम्यान मनवेल गावा जवळील पिळोदा फाट्याजवळ अचानक रस्त्याच्या कडेला रिक्षा कलंडली. अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, मनवेलचे माजी सरपंच अनिल पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली आहे. हवालदार युनूस तडवी, राहूल चौधरी, भुषण चव्हाण आदी पोलिस पथक तपास करीत आहे.