दोन्ही सभागृहात केले दूध दराबाबत निवेदन
हे देखील वाचा
नागपूर:दूध दरावरुन सुरू असलेल्या आंदोलनानंतर सरकारने आता पिशवीबंद दूध वगळून प्रतिलीटर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात विधानसभेत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तर परिषदेत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी या संदर्भात निवेदन केले. यामध्ये पिशवी बंद दुधासाठी कोणते ही अनुदान दिले जाणार नाही. पिशवी बंद दूध वगळून दुधाला प्रति लिटर 5 रूपये अनुदान दिले जाणार आहे.
मात्र अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतरण करणारी संस्था यापैकी एकालाच मिळेल असे यात म्हटले आहे. जे दूध भुकटी उत्पादक 5 रुपये प्रति लिटर लाभ घेतील त्यांना दूध भुकटी निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही असेही यात म्हटले आहे. 21 तारखेपासून शेतकऱ्यांना प्रति लिटर 25 रुपये दर देणार असल्याचे जानकर विधानसभेत म्हणाले. 21 तारखेपासून सहकारी आणि खाजगी दूध संस्थांना 25 रुपये प्रति लिटर दर दिल्यास लाभ मिळेल असे निवेदनात म्हटले आहे.