पिस्तुलाच्या धाकाने लुटणार्‍यास अटक

0

जळगाव/जामनेर । नेरी औरंगाबादकडे जाणार्‍या रोडवरील माळपिंप्री धरणाकडे जाणार्‍या रोडवर ट्रक खराब झाला होता. ट्रक खराब झाल्यामुळे दत्तात्रय फुलारे हे कॉबीनमध्ये झोपले होते. त्यावेळी मोटर सायकलवरून दोन जण येवून पिस्तुलचा धाक दाखवून 4 हजार रूपये घेवून पसार झाले. दरम्यान, दोन जणांनी पैकी एकाला जामनेर पोलिसांनी जळगावातील एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने कुसंबाजवळील विमानतळ परिसरातील सापळा रूचून भुषण उर्फ जिगर बोंडारे याला अटक केली. यावेळी संशयिताकडून एक कट्टा व मोटारासायकल मिळून आली असून पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. यातच दुसरा संशयित गणेश हा फरार झाला आहे. त्याचा शोध जामनेर पोलिसांसह एमआयडीसी पोलिस घेत आहेत.

ट्रक मालकास बंदूकीचा धाक दाखवत चार हजार लुटले
नेरी येथील हॉटेल मालक पंढरी झुंजारे यांनी पोलिसात तक्रार केली की, कोपरगाव येथील दतात्रय भाऊसाहेब फुल्लारे यांचा ट्रक माळपिंप्री धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावर खराब झाला होता. ट्रक खराब झाल्याने ते ट्रकच्या कॉबिनमध्ये झोपले होते. रात्री 2 वाजेच्या सुमारास मोटर सायकलवर भुषण उर्फ जिगर बोंडारे व गणेश हे आले. त्यांनी कॉबिन उघड्याचा प्रयत्न केला. कॅबिन उघडली नाही म्हणून कॉबीनचा काच फोडून फुल्लारे यांना पैशांची मागणी करून लागले. त्यापैकी एकाने पिस्तुलाचा धाक दाखवून 4 हजार रूपये हिसकावून घेतले. त्यांनतर ट्रक चालक फुल्लारे व ढाबा चालक दोघेही मोटर सायकलने नेरीपर्यंत पाठलाग केला. तेथे चहावाला व पंचर वाल्याने एक मोटर सायकल म्हसावदकडे गेल्याचे सांगितले. म्हसावदकडे जातांना शिव ढाब्याचे पुढे दोन जण पंक्चर झालेली पल्सर मोटर सायकल जवळ उभे होते. त्यातील एकाला फुल्लरे यांनी ओळखले असता त्याला पकडण्यासाठी गेलो असता गणेश हा पळाला तर भुषण याने पिस्तुलाचा धाक दाखवून मोटर सायकल सोडून पळून गेला.

रात्री भुषण हा जळगावकडे रिक्षातून जात असल्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखली पीएस आय विकास पाईल, जयसिंग राठोड, संजय जाधव, इस्माईल शेख, सचिन पाटील, सचिन पोळ, योगेश सुतार, तुषत्तर पाटील व राजु अडकमोल यांनी भुषण याचा पाठलाग पाठलाग करीत होते. त्यातच जळगाव पोलिसांना देखील संशयितांबाबत माहिती देण्यात येऊन एका रिक्षातून भुषण बोंडारे हा जळगावात येत असल्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे शरद भालेराव, किशोर पाटील, कैलास धाडी, मिलींद भावसार आदी पोलिस कर्मचार्‍यांनी कुसुंबानजीक असलेल्या विनामतळाजवळ सापळा रचला होता. त्यानंतर जामनेर पोलिसांनीही विमानतळ गाठले. त्यातच रिक्षातून जात असलेला भुषण उर्फ जिगर बोंडारे यास रस्त्यात अडवून पोलिसांनी पकडले. यातच दुसरा संशयित गणेश याच्याकडे देखील गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळालेली आहे. यातच आता एमआयडीसी पोलिसांसह जामनेर पोलिस गणेश याचा शोध घेत आहेत.