पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

0
आळंदी : बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शनिवारी मेदनकरवाडी जवळ केली. अमर राजकुमार राठोड (वय 22, रा. चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदनकरवाडीच्या कमानीजवळ एक तरुण पिस्तुल घेऊन उभा असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून अमर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 26 हजार 500 रुपयांचा ऐवज आढळून आला. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक के के लोखंडे तपास करीत आहेत.