पिस्तूल विक्री करणार्‍याला अटक; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

0

चिंचवड ः पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गणेश रामभाऊ मुंगसे (वय 31, रा. हनुमानवाडी, केळगाव, ता. खेड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंगसे हा खेड तालुक्यातील केळगाव येथे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी (दि. 17) सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 60 हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल मिळून आले. त्याच्याविरूद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी गंगाधर चव्हाण, विठठल सानप, हजरत पठाण, सचिन मोरे, जमिर तांबोळी, यदु आढारी, नाथा केकाण, योगेश्‍वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, महेश भालचिम, राजकुमार हनमंते व सागर जैनक यांच्या पथकाने केली.