पीआरपीतर्फे 27 रोजी मंत्रालयावर महामोर्चा

0

भुसावळ । आपल्या विविध मागण्यांसंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय मजदूर सेना व विविध 10 संघटनांतर्फे गुरुवार 27 रोजी आझाद मैदान येथून दुपारी 12 वाजता मंत्रालयावर प्रा. जोगेंद्र कवाडे व जयदिप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे. पीआरपीच्या मागण्यांमध्ये शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा शासनाने केली असून त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळावा, बियाणे पेरणीसाठी 10 हजार रुपयांची मदत शेतकर्‍यांना द्यावी, बेरोजगारांना बेरोजगार भत्ता मिळण्यास होणारी अडचण तातडीने सोडवावी, घरकुलाचे प्रश्‍न मार्गी लावावे, कंत्राटी कामगारांना बोनस, घरकुल आणि वेतनवाढ देण्यात यावी, मोलकरणींना घरकुलासह पेन्शन मिळावी, अशा विविध 17 मागण्यांचा समावेश असल्याची माहिती पीआरपी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी दिली.