भुसावळ- पुतणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी हलवाईसह अन्य मजुरांना चहा आणण्यासाठी कॅन्टीनकडे जाणार्या संजय बळीराम बर्हाटे (46) यांच्या पायात सुरक्षा बुट नसल्याचे कारण सांगत 210 प्रकल्पाच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 12 वाजेनंतर घडली होती. या प्रकरणी सुरक्षा अधिकारी संजय आनंदा लोकरे यांना अटक करण्यात आल्यनंतर त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती तर बुधवारी सागर संदीप मोरे (22, फेकरी) व राजेश ज्ञानबा बनसोड (25, फेकरी) यांना अटक केल्यानंतर गुरूवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनाही सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.