पुणे । प्रधानमंत्री आवास योजना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अॅथॉरिटी- पीएमआरडीए) राबविण्यात येणार आहे. क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम अंतर्गत हे प्रकल्प राबविले जातील.जिल्ह्यासाठी (शहर, ग्रामीण) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत 2 लाख 19 हजार 75 घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 10 हजार 496 घरे उपलब्ध झाली आहेत. सध्या सुरू असलेल्या 167 प्रकल्पांमधून सुमारे 2 लाख हजार 521 घरे बांधली जाणार आहेत. पीएमआरडीएला 22 हजार घरांची मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकांतर्गत 10 हजार 496 घरांना पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. 30 आणि 60 चौरस मीटरच्या घरांना अनुक्रमे वार्षिक 3 लाख आणि 6 लाखांपर्यंतचे उत्पन्न असे निकष लावण्यात आले आहेत.पीएमआरडीएच्या सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची आणि अर्जाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून प्रशासनाकडून जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यशाळेला बँक, 167 बांधकाम व्यावसायिक, शासकीय अधिकारी, हाडको, सिडकोचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. तसेच गेल्या वर्षी म्हाडाच्या घरांसाठी ज्या नागरिकांनी शासनाकडे अर्ज केले होते, त्यांचेही या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहेत.पीएमआरडीएचे माहिती कक्ष 15 जानेवारीपासून शहराच्या बहुतांश कार्यान्वित होणार आहेत. पीएमआरडीएकडे अर्ज करणार्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार असून योग्य लाभार्थ्यांचे अर्ज बँकांकडे पाठवण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना मूळ किमतीच्या अडीच लाखांपर्यंत अनुदान देणार आहे.दिवसेंदिवस शहरांचे विस्तारीकरण, वाढती लोकसंख्या आणि महागाईमुळे केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला घर घेताना फायदा व्हावा, या उद्देशाने शासनाने ही योजना पीएमआरडीए अंतर्गत संलग्न केली असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.
पीएमआरडीएचा आराखडा
सर्वासाठी घरे या नियमावलीप्रमाणे प्रकल्पांना मान्यता मिळणार
सर्वासाठी परवाडणारे दर ठेवण्याचा प्रयत्न
नवीन स्वस्त दरातले प्रकल्प मंजूर करण्यासाठी यंत्रणा तयार करणार