पुणे-पुण्यात पीएमपीएमएलच्या बसला अपघात झाला आहे. वारजे पुलाजवळ बस ओढ्यात कोसळून हा अपघात झाला आहे. बस कात्रजहून निगडीला जात असताना हा अपघात झाला. अपघातात बसमधील १० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसला ओढ्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली आहे.
सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीसदेखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. वाहतूक पुन्हा पुर्ववत करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु आहे. कात्रजहून वाकड-निगडीकडे जाणारी बस ११ वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडीच्या उड्डाणपुलाजवळ आली. त्या पुलाच्या बाजुलाच काही काम चालु होते. त्याच ठिकाणी एका ओढादेखील आहे. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 20 फूट खोल ओढ्यात पडली.