पुणे । पीएमपीएमएलच्या जेएनएनआरयुएम योजनेअंतर्गत मिळालेल्या बस प्रसन्न टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सने चालवायला घेतल्या आहेत. त्यांच्या ६०-७० चालकांचे पगार अद्याप झालेले नसल्यामुळे या चालकांनी बुधवारी सकाळी संप केला. अखेर ट्रॅव्हल्सचे मालक प्रसन्न पटवर्धन यांनी संप करणार्या चालकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला.
यामध्ये प्रामुख्याने वारजे-माळवाडी ते वाघोली धावणार्या वर्ज्य गाडीचा समावेश असून या संपामुळे कोथरूड ते विश्रांतवाडी, वारजे माळवाडी ते वाघोली, एनडीए गेट ते महापालिका भवन, कोथरूड ते कात्रज, कोथरूड ते कोंढवा या मार्गावर धावणार्या मार्गावरील बससेवा विस्कळीत झाली होती. या मार्गावर अन्य मार्गावरील बस देऊन ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न कोथरूड डेपोतील अधिकार्यांनी केला. या संपामुळे मात्र प्रवाशांचे खूप हाल झाले.
त्यानंतर पटवर्धन यांनी संप करणार्या चालकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्यानंतर या चालकांनी संप मागे घेतला.