पीएमपीएमएल बसेसची संख्या वाढवा

0

चिंबळी । खेड तालुक्यातील चाकण परिसरात म्हाळुंगे, निघोजे, कुरुळी, चिंबळी, आळंदीफाटा या भागात औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला आहे. त्यामुळे येथील छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांची संख्या मोठी आहे. औद्योगिक क्षेत्रामुळे या परिसरातील रहदारीत वाढ झाली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण, कुरुळी, चिंबळी, मोशी हद्दीत कामगारवर्गासह विद्यार्थी व नागरिकांची ये-जा असते. मात्र, येथे एसटी, पीएमपीएमएल बसेसची संख्या कमी असल्याने नागरिकांना नाईलाजाने प्रवासी वाहतूक खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. ही परिस्थिती लक्षात घेता येथे पीएमपीएमएल बसेसच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी आहे. याशिवाय चाकण ते भोसरी रस्त्यावर आळंदी फाटा, कुरुळी, चिंबळी फाटा येथे सिग्नल नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ही समस्यादेखील सोडविण्याची मागणी आहे.