पीएमपीएलकडील नाणे सेन्ट्रल बँक स्विकारणार

0

पुणे- पुण्यातील मोठी सार्वजिक बससेवा असलेली पीएमपीएमएल बऱ्याच अडचणींचा सामना करीत आहे. त्यात सर्वात मोठी अडचण होती ती जमा असलेल्या सुट्टे पैसे (नाणे) वापरात आणण्याचे. ही अडचण आता दूरू होणार आहे. सध्या पीएमपीएलकडे सुमारे 15 लाख रुपयांनी सुट्टे पैसे जमा आहे ते 13 पीएमपीएमएल डिपोमध्ये ठेवण्यात आले आहेत. हे नाणे घेण्यास सेंट्रल बँक ऑफ इंडियाने संमती दर्शविली आहे.

या आधी 4 ऑक्टोबरपासून सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सुट्टे नाणे जमा करण्यास परवानगी नाकारली होती. आता पुन्हा त्यांनी परवानगी दिली आहे. पीएमपीएलने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.दररोज २ हजार बसफेऱ्या होत्यात, त्यातून १. ४० कोटी रुपये भाडे म्हणून जमा होतात. त्यात १.५ ते २ लाख रुपये नाणे असतात.