पीएमपी चालकांच्या बदल्यांना वेग

0

पुणे । पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये (पीएमपीएल) कायम आणि बदली चालकांच्या बदल्यांना वेग आला असून ज्या चालकांची बदली एका आगारातून दुसर्‍या आगारात झाली आहे, अशा चालकांनी सोमवारी (दि.25) बदलीच्या ठिकाणी उपस्थित राहून काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हजेरीपत्रक तयार करा
ज्या चालकांची एका आगागारातून दुसर्‍या आगारात बदली झाली आहे, अशा चालकांनी बदलीच्या ठिकाणी उपस्थित राहून हजेरीपत्रक तयार करावे. सोमवारपासून (दि.25) कामावर उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कारवाईचा बडगा
पीएमपीएलचा कारभार हाती घेतल्यापासून अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी विविध प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. कामगारांनी व्यवस्थित काम करावे म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई बडगा उगारला जात आहे. स्वारगेट आगारातून 20 चालकांची बदली भोसरी आगारात झाली आहे. हडपसर आगारातून 10 चालकांची भोसरी आगारात बदली झाली आहे. कात्रजमधील 4 चालकांची भोसरीमध्ये बदली झाली आहे. मार्केटयार्डमधील 4 चालकांच्या भोसरी आगारात बदल्या झाल्या आहेत. भेकराई नगरच्या 10 चालकांची भोसरी आगारात बदली झाली असल्याचे पीएमपीएलमधील सूत्रांनी सांगितले.