पीएमपी ताफ्यात १६०० नव्या गाड्या दाखल होणार – सिध्दार्थ शिरोळे

0
पुणे : चालू वर्षात पीएमपीच्या बसगाड्यांच्या ताफ्यात १६०० नव्या गाड्या दाखल होतील, अशी माहिती पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
शहरांचे पर्यावरण लक्षात घेऊन डिझेलवर चालणाऱ्या बसगाडयांची खरेदी थांबविण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे . यापूर्वी बसखरेदी अनियमित होती आणि त्यामुळे सुसज्ज आणि पुरेसा ताफा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही .यावेळी मोठ्या प्रमाणात बसखरेदी होत आहे. नव्या गाड्या ताफ्यात आल्यावर तीन हजार गाड्यांचा ताफा होईल आणि त्यानंतर पाच मिनीटाला बस अशी फ्रीक्सन्सी होईल. ही बस खरेदीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आहे असेही शिरोळे यांनी सांगितले.
येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत एक हजार आणि पुढील सहा महिन्यात सहाशे गाडया ताफ्यात येतील. त्यात आठशे गाड्या वातानुकूलीत आणि इलेक्ट्रीक वर धावणाऱ्या आणि आठशे सीएनजी गाडया असतील. वातानुकूलीत बसगाडी असली तरी चालू बसभाडे आकारले जाईल, त्यात वाढ होणार नाही.यातील१२०० गाडया भाडेतत्त्वावर आणि ४००पीएमपीच्या असतील.