पिंपरी चिंचवड ः भरधाव वेगात आलेल्या पीएमपी बसने धडक दिल्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारी दोनच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली. कार्तिक के. व्ही. (वय 25 रा. विश्व विलास हॉटेलच्या मागे, लांडेवाडी, भोसरी), असे अपघातात मृत्यू झालेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास कार्तिक हा आपल्या दुचाकीवरून चालला होता. तो लांडेवाडी येथे आला असता भरधाव वेगात आलेल्या पीएमपीच्या बसने (एमएच 12 आरएन 9075) कार्तिक यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात डोक्यावरून चाक गेल्याने कार्तिक याचा जागीच मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.