पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा नाहीच; सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीस नकार

0

नवी दिल्ली: पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याने लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. संपूर्ण देशात या बँकेची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सरकारला देखील लक्ष केले जात आहे. दरम्यान हवालदिल झालेल्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास आज शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

पीएमसी बँकेतील खात्यात लाखो रुपयांची ठेवी जमा आहेत. बचत खात्यांमध्ये लाखो रुपये जमा आहेत. मात्र, त्यावर निर्बंध असल्याने ते काढता येत नाही. ग्राहकांना आता खात्यातून सहा महिन्यात फक्त चाळीस हजार रुपये काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच तसा निर्णय जाहीर केला आहे. बँकेवरील निर्बंधांविरोधात आणि खातेदार-ठेवीदारांसमोरील अडचणींचा पाढा वाचणारी याचिका दिल्लीतील बिजोन कुमार मिश्रा यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला.