पीएमसी बँकेच्या विलीनीकरणाबाबत आरबीआयशी चर्चा करू: जयंत पाटील

0

मुंबई: पंजाब महाराष्ट्र बँकेत गैरव्यवहार झाल्याने मोठ्या प्रमाणात ठेवी अडकल्या आहेत. काही ठेवीदारांचे चिंतेतून मृत्यू देखील झाले आहे. दरम्यान नवनियुक्त सरकारने पंजाब महाराष्ट्र बँकेच्या विलीनीकरणाबाबत आरबीआयशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसोबत पीएमसी बँकेचे विलीनीकरणासाठी राज्य सरकार आरबीआयशी चर्चा करणार असल्याचे नवनियुक्त मंत्री राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. विलीनीकरण झाल्यास ठेवीदारांच्या ९० टक्के ठेवी सुरक्षित होतील, ठेवी परत करता येईल असे सांगून जयंत पाटील यांनी ठेवीदारांनी संयम ठेवावे, खातेधारकांचे नुकसान सरकार होऊ देणार नाही असे आश्वासन दिले आहे.

ठेवी अडकल्याने कोणत्याही ठेवीदाराने चुकीचे पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे.