पीएमसी बँकेवर रिझव्ह बँकेने घातले निर्बंध

0

शहरातील खातेधारकांमध्ये उडाली खळबळ!

पिंपरी चिंचवड । पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्याने थेरगावसह पिंपरी चिंचवड, पुण्यातील बँकेच्या शाखेवर खातेदारांनी एकच गोंधळ घातला. त्या खातेदारांनी बँकेतील पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या. मात्र, किमान सहा महिने बँकेतील पैसे काढता येणार नसल्याने खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रिझव्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँके(र्झीपक्षरल रपव चरहरीरीहीींर उेेशिीरींर्ळींश इरपज्ञ)वर निर्बंध लादले आहेत. ठइखच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यासंदर्भात रिझव्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे आर्थिक परिस्थिती पाहूनच हा निर्णय घेतला आहे. ठइखने बँकिंग नियमन कायदा कलम 35 अ नुसार ही कारवाई केली आहे. पीएमसी (झचउ इरपज्ञ) बँकेतील व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याच सांगत पुढील 6 महिने सर्व व्यवहारावर निर्बंध घालण्यात आल्याच ठइखने पत्रात म्हटले आहे. या कारवाईमुळे झचउ बँकेला नवी कर्ज देता येणार नाही, तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. या बँकेचे राज्यात 135 शाखा आहेत या सर्व शाखांमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ठइख या कारवाईमुळे बँकेच्या शेकडो खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. झचउ बँकेच्या सर्वाधिक शाखा या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. या शाखामध्ये बहुतांश मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधील खाती आहेत.

बँकेने दिले हो स्पष्टीकरण…
ठइखने घातलेल्या निर्बंधानंतर बँकेचे संचालक जॉय थॉमस यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ही अनियमितता पुढील सहा महिन्यात दूर करण्याचे आदेश बँकेने दिले आहेत. बँकेवर आलेल्या संकटातून नक्कीच बाहेर पडू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. या काळात बँकेच्या ग्राहकांना होणार्‍या त्रासाबद्दल थॉमस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सर्वांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

00000