पालघर | पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतक-यांना सहभागी होता यावे म्हणून रविवारी, 30 जुलै रोजी निमशहरी व ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत, प्रादेशिक ग्रामीण व सहकारी बँका सुरु राहणार आहेत. रिझर्व बँकेच्या आदेशानुसार, ज्या बँकाना सोमवारी साप्ताहिक सुट्टी असते त्या बँकाही पीकविमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी, 31 जुलै रोजी सुरू राहतील. अल्प कालावधी व शेतक-यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.