पीक कर्ज मंजूर होऊनही बँकेकडून रक्कम मिळेना

0

मुक्ताईनगर। जिल्हा बॅक ही शेतकर्‍यांची दुवा म्हणुन ओळख असलेली बॅक आहे. मात्र शेतकर्‍यांनी जवळ पैसे नसताना सुध्दा त्यांनी दुसर्‍याकडून घेऊन पिक कर्ज भरले. परंतु विविध कार्यकारी सोसायटीमार्फत शेतकर्‍यांना पिक कर्ज मंजुर होवुनसुध्दा जिल्हा बॅकेच्या शाखेकडे शेतकर्‍यांना देण्याकरीता पैसेच नाही. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये बँकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे वाटप
सध्या शेतकरी खरीप हंगामासाठी पेरणीच्या कामाला लागला आहे. मात्र अशा वेळेत बँकेत रोकड कमी येत असल्यामुळे प्रत्येकाला वाटप करायची असल्याने प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे सध्या वाटप चालु आहे. परंतु शेतकर्‍यांचे तेवढ्या पैशाांमध्ये बियाणे, नांगरणी व शेती उपयोगी अवजारे हे नविन घेता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

बियाणे खरेदीसाठी पैसे मिळेना
शेतकर्‍यांनी काही दिवसांच्या मुदती पिक कर्ज भरण्याकरीता घेतलेले पैसे सुध्दा पुर्णपणे परत देता येत नाही. म्हणुन शेतकर्‍याला बॅकेच्या पायर्‍या झिझाव्या लागतात. तसेच थोडेफार त्यांच्या खात्यावर पैसे असले तर ते सुध्दा कमी मिळतात. काही दिवसांपुर्वी जिल्हा बॅकेकडून येथील साखर कारखान्याला 51 कोटीचे कर्ज देण्यात आले परंतु शेतकर्‍यांना देण्याकरीता जिल्हा बॅकेकडे पैसे अपुरे पडत असल्यामुळे बॅक कर्ज लवकर मंजुर करत नाही व अपुर्ण रक्कम मिळत असल्यामुळे पेरणीसाठी बियाणे खरेदी तरी कसे करावे असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर पडला असून शेतकरी हवाल दिल झाला आहे.