पीक विमा भरण्याची मुदत वाढणार!

0

मुंबई:- सध्या राज्यभरात पीकविमा भरण्याची लगबग आहे. मात्र ही सुविधा ऑनलाइन असल्याने अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावालागत आहे. 31 जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख असून आतापर्यंत अर्ध्याहुन कमी शेतकऱ्यांनीच पीकविमा भरला असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. यावेळी त्यांनी पीक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर 31 जुलैपर्यंत वाट बघून स्थिती पाहून वाढविण्याचा निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बँकांमधून पीक विमा भरण्यास टाळाटाळ
बँकांमधून पीक विमा भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे मुंडे यांनी सांगितले. पीकविमा भरण्यास उशीर झाल्याने खुप कमी प्रमाणात पीकविमा भरला गेला असल्याचे ते म्हणाले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पीकविमा भरून घेण्याची जबाबदारी बँकांची आहे. त्याचबरोबर आपल सरकार या केंद्रांवरून पीक विमा भरण्याची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. बँकाना निर्देश देण्याबाबत रिझर्व्ह बँकांना पत्र दिले आहे. सुट्टीच्या दिवशीही पीकविमा भरून घेण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऑफलाइन घेण्याची परवानगी देण्यासंदर्भात पत्र दिले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.