यावल : पीक विम्याची रक्कम न देणार्या बँकांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवेदनाद्वारे कृषी मंत्र्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी अनिल चौधरी यांनी केली आहे.
नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांची चौधरी यांनी भेट घेत त्यांना निवेदन दिले.,
दोषी बँकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
रावेर-यावल मतदारसंघासह मुक्ताईनगर भागातील शेतकर्यांना गेल्या वर्षी नुकसान झालेल्या पिकांचीपिीक विम्याची रक्कम मिळाली नाही. अनेक बँका शेतकर्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम न देणार्या बँकांवर गुन्हा दाखल करून शेतकर्यांच्या बचत खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिले. निवेदन देतेप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी यांच्यासोबत नगरसेवक संजय आवटे, केदार सानपसह आदींची उपस्थिती होती.