पीक विम्यापासून शेतकरी वंचित ; दखल न घेतल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

0

जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना निवेदन ; नव्या कर्जदारांना प्राधान्य तर जुन्या कर्जदारांची बोळवण

मुक्ताईनगर- जिल्हा बँकेमार्फत शेतकर्‍यांचा सरसकट पीक विमा उतरविण्याच्या अंतीम दोन दिवसापर्यंत देखील विमा उतरविला जात नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये व पीक विमा उतरवितांनादेखील नव्या कर्जदारांना प्राधान्य देत जुने कर्ज खातेधारकांना डावलण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याने शिवसेनेतर्फे दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून त्यानंतरही सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दुजाभाव न थांबल्यास तीव्र आंदोलन
शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बँकेचे कर्ज खातेदार असलेल्या शेतकर्‍यांचा पीक विमा उतविण्याची 31 ऑक्टोंबर 2018 ही अंतीम मुदत आहे. अनेक शेतकरी, कर्ज खातेदार यांचा पीक विमा उतरविणे बाकी आहे. या पीक विमा योजनेत नवे व जुने खातेदार, असा दुजाभाव न करता सरसकट सर्व शेतकरी, कर्ज खातेदारांचा पीक विमा उतरण्यात यावा व याबाबत जिल्हा बँकेने तत्काळ योग्य ती कारवाई करावी अन्यथा शिवसेनेतर्फे हजारो शेतकर्‍यांच्या सहभागाने प्रचंड आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला तसेच होणार्‍या परीणामास जिल्हा बँक प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, गोपाळ सोनवणे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अफसर खान, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख राजु तळेले, विधानसभा क्षेत्रसंघटक अमरदीप पाटील, कुर्‍हा शहरप्रमुख पंकज पांडव, शहरप्रमुख राजु हिवराळे, गणेश टोंगे, मजीद खान, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सतीश नागरे, युवा सेना तालुकाप्रमुख पिंटु पाटील, प्रफुल्ल पाटील, दीपक खुळे, आनंदा ठाकरे, योगेश पाटील, शुभम शर्मा आदींसह असंख्य शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.