खापर:येथील माजी उपसरपंच ललित जाट यांनी 5 जून रोजी गुजरात राज्यातील जावली, ता.सागबारा येथील गेल्या महिन्यात शॉटसर्किटने आग लागून नुकसान झालेल्या लोकांना मदत करुन वाढदिवस साजरा केला.
गेल्या महिन्यात जावली येथे आग लागून तीन घरांचे पूर्णत:नुकसान झाले होते. त्यावेळी पाण्याचे टँकर आणि जेसीबी मशीन पाठवून तातडीची मदत केली होती. 5 जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पीड़ित कुटुंबांना 32 लोखंडी पत्रे देण्यात आले.यासाठी जि.प.सदस्य प्रताप वसावे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी भूषण जैन, विजय चौधरी,शांतिलाल जैन, छोटू माहेश्वरी, विनोद सेंदाणे, संजय पवार, संजय परदेशी, नितिन जैन, आनंद वसावे, रवींद्र वसावे यांनीही पीडितांना मोलाचे सहकार्य केले.