पीडितेच्या न्यायासाठी जमावाकडून रास्तारोको

0

पाथर्डी । पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावातील इयत्ता सातवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी तिसगावात गाव बंद पुकारण्यात आला आहे. पीडित शाळकरी मुलीला न्याय मिळावा यासाठी संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. गेल्या तीन तासांपासून तिसगावमध्ये रास्ता रोको आणि आंदोलन सुरु असल्यामुळे नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संतप्त नागरिकांकडून आंदोलन तीव्र होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

मुलीच्या रडण्याने बाब उघडकीस
अत्याचारग्रस्त मुलीच्या आईने या मुलीला शाळेत जाण्यासाठी एका अज्ञात इसमाच्या गाडीवर बसवून शाळेत पाठवले होते. या अज्ञात इसमाने आडमार्गी गाडी नेऊन या मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. अत्याचार केल्यानंतर या इसमाने तिसगाव चौकात पीडित मुलीला आणून सोडले. तिथे ही मुलगी मोठ्याने रडायला लागली होती. त्यानंतर लोकांनी चौकशी केली असता ही घटना उघकीस आले.