नागपुर । पीडित तरुणीचा आरोप आहे की, एका पोलिस अधिकार्याने आधी लग्नाचे आमिष दाखवत, तिचे लैंगिक शोषण केले आणि आता तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणून मारहाण करत आहे.नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्यासमोर एका बेंचवर गेले तीन दिवस दिवस-रात्र पीडित तरुणी बसून आहे. 15 एप्रिल रोजी बोलणी करायला घरी बोलावून एका पोलिसउपनिरीक्षकाने मारहाण केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण ?
बलात्काराच्या जुन्या एका प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेला धमकावले.जोपर्यंत तक्रार नोंदवून आरोपी पोलीस अधिकार्याविरोधात गुन्हा नोंदविला जात नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यासमोरुन उठणार नाही, असा निर्धार करत एका तरुणीने नागपुरात पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
मुळात पीडित तरुणीची नागपूरात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकासोबत 2015 मध्ये मैत्री झाली. तिचा आरोप आहे की, संबंधित पोलिस अधिकार्याने वर्षे 2016 मध्ये लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार देत तिला भेटणे बंद केले. सप्टेंबर 2016 मध्ये पीडित तरुणीने पोलिस अधिकार्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली. आधीच्या तक्रारींवर पोलिस काहीच करत नाही आणि आता जुने प्रकरण मागे घेण्यासाठी आरोप लागलेला पोलीस अधिकारी मारहाण करतो आहे, असा आरोप करत पीडित तरुणीने थेट गांधीगिरी सुरु केली आणि तीन दिवसांपासून पोलीस ठाण्यासमोरच एका बेंचवर ठाण मांडले आहे.दुसर्या बाजूला आरोप लागलेल्या पोलिस अधिकार्याने सर्व आरोप फेटाळून लावत तरुणी खोटे आरोप करत असल्याचा दावा केला आहे .