पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए)चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)सतिशकुमार खडके यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर विभागाच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रमोद यादव यांची वर्णी लागली आहे. नियोजनबध्द व सर्वांगीण विकास करणे व विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 14 मार्च 1972 मध्ये स्थापना झालेली आहे. प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी 8 नोव्हेंबर 2016 रोजी खडके यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळात चांगले काम करण्यावर भर दिला. खडके यांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.