36 जागांपैकी 20 भाजप, 12 राष्ट्रवादी तर शिवसेनेला तीन जागा
आता सभापतिपदासाठी जोरदार रस्सीखेच
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीनंतर महत्वाच्या मानल्या जाणार्या विषय समिती सदस्यपदावर सत्ताधारी भाजपचाच वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेत शुक्रवारी झालेल्या सदस्य निवडीत विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा समित्यांच्या प्रत्येकी नऊ याप्रमाणे एकूण 36 सदस्यांच्या निवडी करण्यात आल्यात. पक्षीय बलाबलानुसार, भाजपला 5-5प्रमाणे प्रत्येकी 20 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 3-3प्रमाणे प्रत्येकी 12 जागा, तर शिवसेनेला 1-1 प्रमाणे एकूण तीन जागा मिळाल्या आहेत. सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या सदस्यांच्या नावाचे बंद पाकिटे महापौर नितीन काळजे यांच्याकडे सोपावली होती. त्यानुसार, महापौरांनी नवनियुक्त सदस्यांच्या नावाची घोषणा केली. आता या समित्यांच्या सभापतिपदी निवडीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली असून, सभापतिपदांचे वाटप कसे होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
1. विधी समिती :
माधुरी कुलकर्णी, मनीषा पवार, उषा ढोरे, राजेंद्र लांडगे, वसंत बोराटे (भाजप), सुमन पवळे, संगीता ताम्हाणे, निकिता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन भोसले (शिवसेना)
2. महिला व बाल कल्याण समिती :
हिराबाई घुले, आरती चोंधे, उषा मुढे, निर्मला कुटे, स्वीनल म्हेत्रे (भाजप), मंगला कदम, स्वाती काटे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस), मीनल यादव (शिवसेना)
3. क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती :
अंबरनाथ कांबळे, शैलेश मोरे, सुजाता पालांडे, संजय नेवाळे, अश्विनी बोबडे (भाजप), अनुराधा गोफने, अपर्णा डोके, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी वाघमारे (शिवसेना)
4. शहर सुधारणा समिती :
सीमा चोघुले, माया बारणे, सुरेश भोईर, कमल घोलप, निर्मला गायकवाड (भाजप), वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, उषा वाघेरे (राष्ट्रवादी काँग्रेस), नीलेश बारणे (शिवसेना)
राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडेंना स्थायीची ’लॉटरी’
महापालिकेच्या स्थायी समितीतील भाजपच्या दोन नगरसेवकांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी भाजपचे राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. महापौर नितीन काळजे यांनी ही निवड झाल्याचे जाहीर केले. महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी डावलले गेल्याच्या नाराजीतून सदस्य राहुल जाधव व शीतल शिंदे यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्या जागी राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे या दोघांची निवड करण्यात आली आहे.