पीसीसीओईआरच्या श्रुतीला वीस लाखांचे पॅकेज

0

पिंपरीः पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पीसीसीओईआरच्या श्रुती सुब्रमण्यम हिची जपान, टोकीयो येथील कोनिका कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलमेंट विभागात वार्षिक वीस लाख रुपयांचे पॅकेजवर निवड झाली आहे. पीसीसीओईआरमध्ये आंतरराष्ट्रीय भाषा प्रशिक्षण केंद्रातून विद्यार्थ्यांना मागील तीन वर्षांपासून जपानी भाषा शिकविण्यात येते. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या अंजली टेके या विद्यार्थीनीला मागील वर्षी सतरा लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते.

श्रुती व अंजली यांची निवड प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक प्राध्यापक गुलाब सिरसकर, प्रा. अमृता मुसळे, प्रा. सोनाली लुणावत, प्रा. महेंद्र साळुंखे यांचे सामुहिक यश असल्याचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लांडगे यांनी सांगितले. श्रुतीचे व संबंधित प्राध्यापकांचे पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्‍वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्‍वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्रा. अ.म.फुलंबरकर, प्रा. राजेंद्र कानफाडे यांनीही अभिनंदन केले.