चार लाखांची पारिताषिके पटकावली
आकुर्डीः पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ‘मारुती सुझुकी एसएइ सुप्रा इंडिया 2018 ’ या राष्ट्रीय फॉर्म्युला रेसींग स्पर्धेमध्ये सलग तिसर्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली. बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे फॉर्म्युला रेसींग ट्रॅक येथे झालेल्या सातव्या ‘मारुती सुझूकी एसएई सुप्रा इंडिया 2018’ स्पर्धेत यावर्षी देशभरातून आयआयटी, एनआयटी सह 126 अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये नामांकित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करुन पीसीसीओईच्या यांत्रिकी विभागाच्या ‘टिम क्रेटॉस रेसींग टिमने ओव्हर ऑल गटात प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे पारितोषिक, इंजिनिअरींग डिझाईन गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजाराचे पारितोषिक, कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरींग गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजारांचे पारितोषिक, इंजिनिअरींग एक्सलंस गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजाराचे पारितोषिक, बिझनेस प्लान गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजाराचे पारितोषिक, स्किड पॅड गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजाराचे पारितोषिक, ऑटो क्रॉस गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजाराचे पारितोषिक अशी एकूण चार लाख एैंशी हजार रुपयांची सात पारितोषिके पटकाविली.
पीसीसीओईचा विक्रम
सन 2016 व 17 मध्ये सुध्दा पीसीसीओईने प्रथम क्रमांक पटकाविला होता. यावर्षी सुध्दा प्रथम येऊन संपूर्ण भारतामध्ये सलग तिसर्यांदा प्रथम येण्याचा विक्रम पीसीसीओईने केला आहे. या टिममध्ये कुशल ढोकरे (कॅप्टन), प्रतिक वायकर, अभिषेक पाटील, प्रफुल्ल भोसले, सुबोध म्हसे, विरेंद्र निचित, राघवेंद्र मानिकवार, शुभांग डिगे, मोहित मारु, शिवकुमार मिरजगावे, परम देसाई, शुभम पाटील, प्रभंजन शेळके, ऋषिकेश कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, गोपाल काब्रा, आदित्य पाटील, तेजस कराड, रौनक गुप्ता, राहुल औताडे, सर्वेश देशमुख, राहुल कन्नावर, श्रेयश पदमावार, आकाश नांदिर्गी, आहम मेमन, संकेत कामत, नैनेश देसले, शांतनू दाहसकर, मोहनिश पोटू, आकाश शिंदे, पुरुषोत्तम दोशी, निरंजन तारले, साहिमान देशमुख, कृष्णाई मुंढे, पुजा नरवाडे, समाधान दोर्गे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रा. अमोल सुर्यवंशी व प्रा. निलेश गायकवाड हे टिम क्रेटॉस रेसींगचे फॅकल्टी अडव्हाईजर म्हणून गेली पाच वर्षे काम करत आहेत. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.अ.म.फुलंबरकर व यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र देवरे यांचे मार्गदर्शन मिळाले.