पीस मुव्हमेंटचे न्याय्य मागण्यासाठी आंदोलन

0

जळगाव । मुव्हमेंट फॉर पीस अ‍ॅण्ड जस्टिस फॉर वेल्फेअर जळगावने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यात मुस्लिम अल्पसंख्याक समुदयाच्या कल्याणाकरीता सच्चर समितीच्या शिफारशी लवकरात लवकर पूर्णत: लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. निवेदन देऊन मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाच्या हितांच्या रक्षणार्थ लवकरात लवकर पावले उचलण्यासाठी मागणी करण्यात आली.

या होत्या मागण्या
सच्चर समितीच्या शिफारसी पूर्णत: लागू करणे, पंतप्रधानाच्या 15 सूची कार्यक्रम आणि एमएसडीपीचे कार्यान्वयन करा, न्यायालयाच्या शिफारशीनुसार शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समुदायासाठी आरक्षण, विविध अल्पसंख्याक कल्याण योजना लागू करणार्‍या विभागांमध्ये अनेक वर्षांपासून रिक्त पदांवर अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती, अल्पसंख्याकांसाठीच्या कल्याणकारी योजनांमध्ये राज्यांच्या अर्थसंकल्पात वाढ व सच्चर समितीच्या शिफारसींनुसार समान संधी आयोग आणि स्वायत्त आकलन व देखरेख प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश होता.