जळगाव- उपनगर पिंप्राळा येथील पी़एम़मुंदडे विद्यायालयात शनिवारी संस्कृत दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या मुख्याध्यापक अध्यक्षस्थानी भरत पाटील हे होते. यावेळी खुशी साळुंखे, निहाल शिंदे, कल्पेश कुंभार, प्रतिक पाटील या विद्यार्थ्यांनी संस्कृत व कालिदास यांची माहिती उपस्थितांना दिली. सूत्रसंचालन रत्ना बागुल यांनी केले तर आभार राकेश चौधरी यांनी मानले.