पी.आर.पाटील यांच्या दुरदृष्टीमुळे कारखाना सुस्थितीत

0

शहादा । बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा जोमाने उभा करण्यामागे कारखाण्याचे कार्यकारी संचालक पी.आर पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. दुरदृष्टीने त्यांनी चांगल्यास्थीतीत कारखाना सांभाळत कर्मचार्‍यांशी आपुलकी साधत आपली कर्तव्य पार पाडीत आहेत. सतत कामामुळे त्यांनी आपली आगळी वेगळी प्रतिमा निर्माण केली असे गौरोगद्गार सातपुडा सागर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी काढले. सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर पाटील यांच्या 58 व्या जन्मदिवसानिमित्त कारखान्यात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

कारखाना साडे चार लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट साधणार
यावेळी नगिन तात्या पाटील,प्रा.मकरंद पाटील,कृऊबाचे चेअरमन सुनिल पाटील,उद्धव पाटील,सुतगिरणीचे कार्यकारी संचालक आर.डी पाटील,कृऊबाचे सचिव हेमंत पाटील,रमाकांत पाटील,जाधव पाटील आदी उपस्थित होते.पुढे बोलतांना पाटील म्हणाले की,सातपुडा कारखाना संकटात असतांना चांगल्या माणसांनी आम्हाला साथ दिली.न डगमगता पी.आर पाटील यांनी कारखाना सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केलेत. कारखान्यासोबत त्यांचे अतुट नाते जोडले गेले आहे. आज कारखाना साडे चार लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट साधणार आहे. हे सर्व कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या परीश्रमामुळे. यावेळी पी.आर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन जनसंर्पक अधिकारी प्रविण पाटील यांनी केले.