पी. चिदंबरम यांचे जीएसटीवर चर्चासत्र

0

पुणे । जीएसटीबाबत व्यापार्‍यांच्या मनात असंतोष आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

हे चर्चासत्र रविवारी (दि. 23 जुलै) सायंकाळी 4.30 वा. मुकुंदनगर येथील थ्रीडी हॉलमध्ये संपन्न होणार होणार आहे. माजी आमदार मोहन जोशी, युवक प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, गोपाळ तिवारी, अ‍ॅड. अभय छाजेड, म. वि. अकोलकर यावेळी उपस्थित होते. देशभरातील अनेक व्यापारी जीएसटी विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसने 2011 साली आणलेले जीएसटी विधेयक आजच्या पेक्षा वेगळे आणि कमी कर असलेले होते. एक देश, एक टॅक्स संकल्पनेला या जीएसटीमुळे छेद गेलेला आहे. व्यापारी वर्गात असलेली नाराजी आणि 28 टक्केपर्यंतची करवाढ आर्थिक विकासाला घातक आहे. जीएसटीच्या एकंदरीत परिणामांची कारणमिमांसा पी. चिदंबरम या चर्चासत्रात करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.