पी.चिदंबरम यांच्या अटकेला स्थगिती

0

नवी दिल्ली-एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात आता कार्ति चिंदबरम यांच्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) फास त्यांचे वडिल आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवती फास आवळण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, चिदंबरम यांच्या अंतिम जामीन याचिकेवर सुनावणी करताना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कोर्टाने ईडीला ५ जूनपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या कार्टात चिदंबरम यांच्यावतीने काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत. यापूर्वी एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात ३ एप्रिलला ईडीने सुप्रीम कोर्टात चौकशीचा सीलबंद अहवाल सादर केला होता. यामध्ये ईडीने युपीए सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले पी. चिदंबरम यांच्यावर याप्रकरणी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे.