पी.चिदंबरम यांच्या अटकेस मुदतवाढ

0

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकेपासून २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी त्यांना हायकोर्टाने १ ऑगस्टपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. याप्रकरणी १९ जुलै रोजी केंद्रीय तपास पथकाने (सीबीआय) दिल्ली हायकोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये पी. चिदंबरम यांना एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात सहआरोपी करण्यात आले होते.

या ओरापपत्रात चिंदबरम यांच्याशिवाय इतर १६ जणांच्या नावांचाही उल्लेख होता. यामध्ये विद्यमान आणि निवृत्त सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एअरसेल-मॅक्सिस व्यवहारातील ३,५०० कोटी रुपयांच्या तर आयएनएक्स मीडिया प्रकरणातील ३०५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेले पी. चिदंबरम हे तपास पथकांच्या रडारवर आहेत. 2G स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाल्यानंतर त्यातूनच एअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहाराचे प्रकरण बाहेर आले होते. यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडून (FIPB) मेसर्स ग्लोबल कम्युनिकेशन होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला एअरसेल या टेलिकम्युनिकेशन कंपनीत गुंतवणुकीसाठी बेकायदा परवानगी देण्यात आली होती.