चेन्नई : सीबीआयने चेन्नईत मंगळवारी सकाळी एकाच वेळी 14 ठिकाणी छापेमारी केली. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजिव कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.
एअरसेल-मॅक्सिस डील
फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डच्या (FIPB) निधीशी संबंधित माहिती आणि एअरसेल-मॅक्सिस डीलशी संबंधित दस्ताऐवज तपासले जात आहेत. याआधी सीबीआयने कार्ती चिदंबरम आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या एका कंपनीला कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली होती. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा या कंपनीवर आरोप आहे.
आवाज दाबण्याचा प्रयत्न
सरकार सीबीआय आणि तपास संस्थांच्या माध्यमातून माझा मुलगा आणि त्याच्या मित्रांना लक्ष्य करत आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार मला काहीही लिहिण्यासाठी रोखत आहे.
-पी. चिदंबरम
सुडाचे राजकारण
मोदी सरकार सुड भावनेतून ही कारवाई करत आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये घोटाळे बाहेर येत आहेत, परंतू तेथे कारवाई केली जात नाही. व्यापम त्याचे मोठे उदाहरण आहे. व्यापम घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश मोदी किंवा त्यांचे सरकार आदेश का देत नाही.
-दिग्विजय सिंह, कॉंग्रेस नेते