वरखेडी। येथील श्रीमती पी.डी.बडोला माध्यमिक शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशव्दाराजवळ रांगोळी व सजावट करण्यात आली होती. मुख्याध्यापक ए.के.पाटील, एस.पी.चव्हाण, ए.बी.ठोके, अमोल पाटील, एन.एस.चौधरी, गणेश आगळे, एन.व्ही.पाटील, संगीता सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
जिल्हा परिषद उर्दू शाळा भोकरी या ठिकाणी सरपंच सलमाबी रशीद, डॉ.रशीद शब्बीर काकर, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष यांनी नव्याने पहिली आलेल्या मुला-मुलीचे पुष्प देऊन स्वागत केले व 1 ते 7 वीच्या मुला पुस्तक वाटप केली. तर जिल्हा परिषद मराठी शाळा वरखेडीमध्ये शाळेच्या पहिला दिवशी सरपंच प.स.सदस्य शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष, ग्रा.प.सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष मुखध्यापक व केंद्र प्रमुख यांच्याहस्ते पहिलीत आलेल्या मुलांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.