मुंबई । यूबीएम इंडिया आघाडीच्या बी2बी प्रदर्शन आयोजनकर्त्यांनी त्यांच्या सीपीएचआय ण्ड पी-मेक इंडिया 2017 या मुख्य आणि जगातील आघाडीच्या फार्मा नेटवर्किंग प्रदर्शनात गणल्या जाणार्या प्रदर्शनाच्या 11व्या पर्वाचा शुभारंभ केला. हे भव्य प्रदर्शन मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंड 27 ते 29 नोव्हेंबर आणि बॉम्बे एक्झिबिशन सेंटर 28 ते 30 नोव्हेंबर अशा दोन ठिकाणी भरणार आहे. यंदाच्या या भव्य कार्यक्रमात 40 देशांमधील 1500 हून अधिक प्रदर्शकांचा समावेश आहे. सीपीएचआय एण्ड पी-मेक इंडिया 2017चा उद्घाटन सोहळा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंडमध्ये पार पडला.
28 ते 30 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शन
या सोहळ्याला केमेक्सिलचे अध्यक्ष सतीश वाघ, यूबीएम इंडियाचे समूह संचालक राहुल देशपांडे, यूबीएम आशिया लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम एसिंक, कॅबटेक टेक्नोलॉजीजचे संचालक आसीफ खान, खिमसरिया असोसिएट्सचे संचालक राजेंद्र खिमसरिया, फार्मापॅक पॅकेजिंग इक्विपमेंटचे संचालक खाजा निजामुद्दिन, यूबीएम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास यांच्यासह या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. सीपीएचआय इंडिया या व्यासपीठावर एपीआय, जेनेरिक्स, एक्सिपंट्स अॅण्ड ड्रग फॉर्म्युलेशन, फाईन केमिकल्स, बायोसिमिलर्स, फिनिश्ड फॉर्म्युलेशन्स, लॅब केमिकल्स आणि बायोटेक्नोलॉजीचे सीआरओज, सीएमओज आणि उत्पादक उपस्थित आहेत. तर, पी-मेकमध्ये फार्मा मशिनरी आणि इक्विपमेंट, नालिटिकल इक्विपमेंट, ऑटोमोशन अॅण्ड रोबोटिक्स, पॅकेजिंग इक्विपमेंट अॅण्ड सप्लाईज, प्लांट/फॅसिलिटी इक्विपमेंट, इ.उत्पादकांचा समावेश असणार आहे.